WELCOME TO S. B. COLLEGE, SHAHAPUR
single
मोडी लिपी कोर्स – 24 जुलै 2019 ते 31 जुलै 2019

बुधवार , दिनांक 24 जुलै ते 31 जुलै 2019 या काळात आपल्या महाविद्यालयात इतिहास विभाग आणि वसुंधरा भाषा मोडीलिपी संशोधन आणि संवर्धन केंद्र ,पुणे यांच्या संयुक्त विद्येमाने  मोडी लिपी लेखन वाचन प्रारंभिक  प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधरा भाषा मोडीलिपी संस्थेचे अध्यक्ष श्री. महेश सुरेश जोशी लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी मंडळाचे सचिव श्री. बाळकृष्ण पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. बि. व्ही. शिदे सरांनी केले . प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक डॉ. जी .जी. सोनवणे तर आभारप्रदर्शन प्रा. स्मिता भोये  यांनी केले .

प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की मध्ययुगीन भारतात शिवकाळ,पेशवे काळ, व बहमनीकाळातील प्रचंड दस्ताऐवज मोडी लिपीत आहेत.मोडीलिपी ही त्या काळी राजलिपी होती. या लिपीचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यां बरोबर समाजालाही रोजगार मिळावा म्हणून मोडी लिपी शिकण्याची संधी उपलब्द करून देण्यात आली.  शहापूर पडघा, कल्याण, किन्हवली व बदलापूर  या ठिकाणाहून अनेक नागरीक,व विद्यार्थी यांनी हजेरी लावली होती.  या One Week  प्रोग्रॅमला 75 विद्यार्थी उपस्थित होते.