सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर येथे IQAC आणि Innovation, Incubation & Start Up Clinic केंद्रामार्फत दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता "Entrepreneurship and Start Up: Passion to Profit “ या विषयावर एक दिवसीय सेमिनार यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मनोज पाटील, संचालक, व्हायब्रंट इंडिया इकॉनॉमिक कौन्सिल, मुंबई तसेच अध्यक्षस्थानावर आदरणीय डॉ. संतोष गायकवाड सर, उपप्राचार्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. प्रास्ताविकातून आजच्या काळातील उद्योजकतेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी त्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. प्रमुख पाहुणे मा. श्री. मनोज पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून उद्योजकतेची संकल्पना, नवोन्मेषाचे महत्त्व तसेच “Passion to Profit” या प्रवासाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांनी आपल्या उद्योगक्षेत्रातील अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, संधी, आव्हाने आणि त्यावर मात करण्याचे उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी या सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला आणि प्रश्नोत्तर सत्रात विविध प्रश्न विचारले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत त्यांना व्यावहारिक दृष्टिकोन दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेषतः अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा (डॉ.)अंकुश मोरे सहायक प्राध्यापिका, डॉ. सीमा पार्टोळे व सरला कातकडे आणि सहायक प्राध्यापक श्री. प्रवीण ठाकरे यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) अनिलकुमार सिंग तसेच IQAC समन्वयक प्रा. (डॉ.) शहाजी वाघमोडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सेमिनारमुळे विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेविषयीच्या ज्ञानात भर पडली तसेच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, आयोजक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली













