WELCOME TO S. B. COLLEGE, SHAHAPUR
single
International Yoga Day Celebration 21st June 2022

दिनांक 21 जून 2022 रोजी शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. ‘आरोग्य हिच खरी संपत्ती’ या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे विद्यार्थी या दिनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेनेचा सिनिअर अंडर ऑफिसर रोहन रेड्डी याने केले. महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट चे प्रमुख लेफ्टनंट डॉ. एस. एस. बुधवंत आणि एनएसएस युनिट चे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजू शनवार व प्रा. सुनील पवार यांनी प्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. सिंह सर, उपप्राचार्य डॉ. एस. एल. गायकवाड सर, योग प्रशिक्षण देणार्‍या नजमा शेख मॅडम, जिगर बेहरे सर, साहिल शेख सर, शैलेश शेवडे सर, तसेच ग. वि. खाडे विद्यालयाचे एन.सी.सी.चे प्रमुख फर्स्ट ऑफिसर श्री. विलास जोशी सर या सर्वांचे फूल देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिपाई वर्ग, सर्व एन.सी.सी. आणि एन.एस.एस.चे विद्यार्थी आणि ग. वि. खाडे विद्यालयातील एन.सी.सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाप्रकारे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.